वर्षा ननवरे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार
वाघोली : कोरेगाव मूळ येथील अमर एज्युकेशन शाळेच्या उपशिक्षक वर्षा सोमनाथ ननवरे यांना हवेली तालुका माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षक लोकशाही आघाडी हवेली यांच्यावतीने २०२१-२२ या वर्षाचा तालुका स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी सुनंदा वाखारे यांच्या हस्ते देण्यात आला.
हवेली तालुका माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षक लोकशाही आघाडी हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा वाघोली येथील भारतीय जैन संघटना विद्यालयामध्ये मोठ्या दिमाखात पार पडला.या सोहळ्यास हवेली तालुक्यातील २० शिक्षकांना गुणवंत पुरस्कार देण्यात आला तर ५ शाळांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय जैन संघटना शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंखे होते तर उपस्थितांमध्ये पुणे महानगरपालिकेचे सह्हायक शिक्षण अधिकारी एम.आर. जाधव ,महाराष्ट्र टीडीएफचे कार्याध्यक्ष जी.के.थोरात, टीडीएफ पुणे जिल्हा सचिव के.एस.ढोमसे,माध्यमिक शिक्षक संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष वसंतराव ताकवले,हवेली तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष अशोक नाळे,सचिव पांडुरंग पवार, किसान कोकाटे,मधुकर खरात हे मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!