अवैद्य सावकारी ! 50% व्याजदराने पैसे देणाऱ्या बाबा बोडके टोळीतील एकाला अटक

पुणे : पुणे शहरातील एका बांधकाम व्यवसायिकाकडून प्रतिमहा पन्नास टक्के दराने व्याज घेऊन खंडणीची मागणी केल्याप्रकरणी बाबा बोडके टोळीतील एकाला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक – 2 ने अटक केली आहे.

निलेश श्रीकांत जोशी (वय 40, रा. सारंगा टेरेस, फ्लॅट नं. 11, सर्व्हे नं. 12/1/2, आनंदनगर, वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. जोशी याच्या विरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात अवैध सावकारी व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्यता माहितीनुसार,अटक करण्यात आलेला निलेश श्रीकांत जोशी हा कुख्यात बाबा बोडके टोळीचा सदस्य आहे. त्याच्यावर 2006 मधील एका खून प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. एका बांधकाम व्यवसायिकाने जोशी याच्याकडून सप्टेंबर ते डिसेंबर 2021 या कालावधीत 25 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.

कर्जावर प्रतिमहा पन्नास टक्के व्याज देण्याचे कबूल करून दिलेली रक्कम व व्याज असे मिळून 50 लाख रुपये देण्याबाबत जोशी याने व्यवसायिकाकडून नोटराईज समजुतीचा करारनामा करून घेतला. त्यामध्ये व्यवसायिकाने 25 लाख रुपयांच्या मोबदल्यात 22 डिसेंबरपर्यंत 50 लाख रुपये देण्याचे कबूल करून घेतले.

तसेच जर व्यवसायिकाने निर्धारीत केलेल्या वेळेत ठरल्याप्रमाणे पैसे दिले नाही तर त्यांच्याकडील कोथरुड येथील 1200 स्क्वेअर फुटाच्या सदनिकेचा ताबा देईल असे लिहून घेतले. मात्र ठरल्याप्रमाणे व्यवसायिक पैसे परत करू शकले नाहीत. त्यामुळे आरोपी जोशी हा तक्रारदार व्यवसायिकाच्या मोबाईलवर फोन करून शिवीगाळ करत कुटूंबातील सदस्यांचे बरेवाईट करण्याची धमकी देत होता.

होणार्‍या त्रासाला कंटाळून संबंधिताने गुन्हे शाखेच्या खंडणीच विरोधी पथक – 2 यांच्याकडे संपर्क साधून तक्रार दिली. खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी तक्रार अर्जाची चौकशी करून पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी निलेश श्रीकांत जोशी याच्याविरूध्द अर्जदाराने फिर्याद दिल्यानुसार विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि त्यास अटक केली.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलिस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, सचिन अहिवळे, अमोल पिलाने, प्रविण पडवळ, चेतन शिरोळकर, मोहन येलपल्ले आणि महिला अंमलदार आशा कोळेकर यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.