पुणे स्टेशन परिसरात मेफेड्रोन ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या आलेल्या दोघांना अटक
पुणे : पुणे स्टेशन परिसरात मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडुन पोलिसांनी साडे पंधरा लाखांचे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स जप्त केले आहे.
सलीम मुबारक शेख (वय, 37, रा. सहारा अपार्टमेंट, नवाजीश पार्क चौक, कोंढवा) आणि विजय विनोद डेडवालकर (वय, 33, रा. बरके आळी, सोमवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन परिसरातील तुकाराम शिंदे वाहनतळाजवळ दोघेजण दुचाकीवरून आले असून त्यांच्याकडे अमली पदार्थ असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. या माहितीनूसार पथकाने सापळा लावला. यानंतर सलीम शेख आणि विजय डेडवालकर या दोघांना पुणे स्टेशन परिसरातून अटक करण्यात आले. त्यांच्याकडून 15 लाख 67 हजारांचे मेफेड्रोन, रोकड, मोबाइल संच, दुचाकी, इलेक्ट्राॅनिक वजन काटा असा एकूण 17 लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
सदरची कारवाई पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता , सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, मनोज साळुंके , पांडुरंग पवार, विशाल दळवी यांनी केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!