डोळ्यावर स्कार्फ बांधून चौथ्या मजल्यावरून उडी घेत २४ वर्षीय तरुणीची आत्महत्या ; वाकडंमधील घटना

पिंपरी चिंचवड : डोळ्यावर स्कार्फ बांधून  चार मजली इमारतीच्या छतावरून उडी मारून २४ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली.  ही धक्कादाक घटना वाकड येथे सोमवारी (दि. २०) सकाळी ७ च्या सुमारास धक्कादाक घटना घडली. या तरुणीच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही

नम्रता गोकुळ वसईकर (वय २४, रा. नंदनवन कॅालनी, माऊली चौक, वाकड, मूळ रा. दराणे रोहले, ता. शिंदखेडा, जि. धुळे), असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत नम्रताचे ‘बीटेक’ (आयटी) पर्यंत शिक्षण झाले होते. दरम्यान, सोमवारी सकाळी पावणेसहाच्या सुमारास ती घरातून बाहेर निघाली. माऊली चौकातील एका चारमजली इमारतीच्या छतावर गेली. तेथे चेहरा आणि डोळ्यांवर स्कार्फ बांधून इमारतीच्या छतावरून तिने उडी मारली. यात तिच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. याबाबत एका व्यक्तीने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नम्रता हिच्या चेहऱ्यावरील स्कार्फ कापून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र ओळख पटली नाही. तिला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

दरम्यान, नम्रता घरी न परतल्याने तिच्या कुटूंबियांनी शोध सुरू केला. सायंकाळी उशिरा ते वाकड पोलीस ठाण्यात गेले. मयत नम्रताचा फोटो पोलिसांना दाखविला. त्यांतनर नम्रताने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी तिच्या कुटुंबियांना सांगितले. शवविच्छेदन करून नम्रताचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.

मयत नम्रता हिचे ‘बीटेक’ (आयटी) पर्यंत शिक्षण झाले. तिच्यापेक्षा लहान असलेल्या तिच्या भावाला नोकरी लागल्याने सहा महिन्यांपूर्वी त्यांचे कुटूंब धुळे जिल्ह्यातून वाकड येथे स्थायिक झाले. तिची आई गृहिणी असून वडील चर्मकार म्हणून चप्पल-बूट शिवण्याचे तसेच पाॅलीश करण्याचे काम करतात. सामान्य असलेल्या वसईकर कुटुंबाला या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.