‘ते’ पुण्यात विमानाने यायचे, चोऱ्या करायचे अन् व्यायचे भुर्रर्र…
पुणे: विमानाने येवुन घरफोडी करणा-या आंतरराज्यीय चोरांना गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली आहे. हे चोरटे उत्तरप्रदेशातून चोरी करण्यासाठी विमानाने पुणे शहरात यायचे. चोरी झाल्यानंतर त्यातील एक जण चोरीचा मुद्देमाल घेऊन ट्रॅव्हल्सने जायचा. तर इतर सर्व विमानाने उत्तर प्रदेशात परत जायचे. त्यांच्याकडून 6 लाख 37 हजाराचे 130 ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले.
परवेज शेर मोहम्मद खान (वय 43 धंदा- कपडे वक्री, रा. ग्रेटर नोयडा, उत्तर प्रदेश) व तस्लीम अरिफ समशुल खान (वय 23 रा. मु. पो. धुमरी ता. अलीगंज जि. ऐटा, उत्तर प्रदेश ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात सातत्याने घरफोड्या रोखण्यासाठी शाखेचे पोलीस माहिती घेत होते. यादरम्यान त्यांना आंतरराज्यीय रेकॉर्डवरील गुन्हेगार रेकी करून घरफोडीचे गुन्हे करत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. यातील दोन चोरटे लोहगाव येथे थांबले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली.
त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत जबरी चोरी केल्याचे कबूल केले. या चोरीतील 130 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. दोघेही आरोपी सराईत गुन्हेगार आहे. चोरी करण्यासाठी ते उत्तर प्रदेशातून पुण्यात विमानाने यायचे. चोरी केल्यानंतर एक जण बसने मुद्देमाल घेऊन जायचा तर दुसरा परत विमानाने जायचा. यातील दोघांवरही यापूर्वी देखील चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
आरोपी परवेज शेर मोहम्मद खान याचेविरुध्द चोरीचे पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालयात यापुर्वी गुन्हे दाखल आहेत. तर तस्लीम अरिफ समशुल खान याचेविरुध्द दिल्ली येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत. परवेज खान याच्यावर हा कपडे विक्रीचा व्यवसाय करायचा, तो पुर्वी विश्रांतवाडी परिसरात रहायला असल्याने त्याला परिसराची खडाणखडा माहिती होती. 2016 मध्ये त्याला एका घरफोडीच्या गुन्हयात अटक झाल्यावर शिक्षा भोगून तो पुन्हा उत्तर प्रदेशात रवाना झाला होता.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह-आयुक्त रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, सहा पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!