महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत काढला व्हिडीओ, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत केला वारंवार बलात्कार ; पिंपरी चिंचवड मधील धक्कादायक घटना

पिंपरी चिंचवड : महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत त्याचा व्हिडीओ काढला. त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार जुलै ते २२ डिसेंबर या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र भांगले (रा. पाषाण, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने बुधवारी (दि. २२) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी भांगले याने महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून त्याचा व्हिडीओ काढला. ‘जर शारीरिक संबंधास विरोध केला तर व्हिडीओ व्हायरल बदनामी करेन’ अशी आरोपीने महिलेला धमकी दिली. महिलेच्या संमतीशिवाय तिचे 60 हजारांचे नेकलेस, 18 हजारांचे मंगळसूत्र घेऊन महिलेला मारहाण केली. आरोपीने फिर्यादी महिलेला वारंवार व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.