चाकण : भर चौकात पैलवानाची गोळ्या घालून हत्या

शेलपिंपळगाव : कुस्ती तालीम चालवणारे पैलवानाची भर चौकात गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हल्लेखोरांनी त्यांच्यावर 4 गोळ्या झाडल्याचे समोर आले असून जुन्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.२४) रात्री सव्वानऊच्या सुमारास शेलपिंपळगाव येथील मिलिंद बिअर शॉपी जवळ घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

नागेश सुभाष कराळे ( वय ३८, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे ) असे खून झालेल्या पैलवानाचे नाव आहे. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तत्काळ सर्वत्र नाकाबंदी केली असून हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहे. या घटनेमुळे पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शेलपिंपळगाव येथील मिलिंद बिअर शॉपी जवळ गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास नागेश कराळे हे आपल्या चारचाकी गाडीत बसत असताना एका गाडीत दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.  त्यांना चाकण येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांची मयत झाल्याचे घोषित केले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल धाव घेऊन पाहणी केली.

जुन्या वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. हल्ल्यात मृत पावलेले नागेश कराळे हे शेलपिंपळगाव येथे कुस्तीची तालीम चालवणारे पैलवान म्हणून परिचित आहेत. दरम्यान चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित वाहनाची तपासणी केली आहे. चाकण पोलिसांनी काही भागात नाकाबंदी देखील केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शेलपिंपळगाव येथे धाव घेतली आहे. कराळे यांना चार गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अद्याप पोलिसांच्या हाती कुणीही लागलेले नसल्याची माहिती समोर येत आहे. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पिस्तूलमधून गोळ्या झाडून हत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे थेट आयर्नमॅन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.