दापोडी भाजपाच्यावतीने भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी सुशासन दिन साजरा
पिंपरी चिंचवड :भारतरत्न देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी दापोडी भारतीय जनता पक्षाच्या वतीने नरवीर तानाजी चौक येथे , दापोडी विभागातील सफाई कर्मचाऱ्यांचा जल व पुष्प चरण अर्पण करून तसेच तुळशीचे रोप आणि भारत मातेची प्रतिमा भेट देत सर्व सफाई कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला,तसेच या कार्यक्रमावेळी महिला सफाई कर्मचारी यांच्या वतीने स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आले व तुळस पूजन दीन निमित व वटवृक्षाचे पूजन करण्यात आले……!!!
माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांनी स्वर्गीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती ही सुशासन दिन म्हणजेच कायदा-सुव्यवस्था चांगले प्रशासन असलेले पंतप्रधान म्हणजेच सुशासन दिन होय असे मनोगत व्यक्त केले. तर तर भाजपा सचिव विशाल वाळुंजकर यांनी सर्व सफाई कर्मचारी ही आपल्या दैनंदिन कामात योग्यरीत्या सफाई करत असतात आपलं विभाग स्वच्छ ठेवत असतात त्यांचा सन्मान करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे असे बोलताना व्यक्त केले.
या कार्यक्रमावेळी आरपीआयचे नेते माजी नगरसेविका चंद्रकांताताई सोनकांबळे, रेल्वे विभागीय सल्लागार समिती सदस्य विशाल वाळुंजकर, आरपीआय उपाध्यक्ष सिकंदर सूर्यवंशी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयंत मोरे, उपाध्यक्ष गावडे साहेब, नवनाथ डांगे, अनुसूचित जाति मोर्चा मंडल अध्यक्ष धर्मेंद्र क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते आमीर भाई शेख, सुधीर चव्हाण, नाना ढोकले, घनश्याम सकट ,राजू कानडे, ओंकार जगताप, नजीर शेख, संदीप तोरणे, शैलेश तोरणे, मोहिद शेख तसेच सफाई विभागातील सर्वच कर्मचारी पुरुष व महिला उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आमिर शेख यांनी तर सूत्रसंचालन घनश्याम संकट आभार सुधीर चव्हाण यांनी व्यक्त केले ……!!! कार्यक्रमाचे मुख्य संयोजन भाजपा शहर सचिव विशाल वाळुंजकर यांनी केले
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!