मोठी बातमी : 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी या तारखेपासून सुरू होणार कोविनवर नोंदणी ; असं करा रजिस्ट्रेशन
नवी दिल्ली : कोरोना महामारीविरुद्धच्या लढाईत भारताने एक पाऊल आणखी पुढे टाकले आहे. 3 जानेवारीपासून देशात 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होणार आहे. लसीकरणासाठी मुलांची नोंदणी करणे आवश्यक असून CoWin अॅपद्वारे मुलांची नोंदणी करण्यात येणार आहे.
लसीकरणासाठी अल्पवयीन मुलांची नोंदणी CoWin अॅपद्वारे होणार आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे सीईओ डॉ. आर.एस. शर्मा यांनी सांगितले की, एक जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वर्षाच्या मुलांच्या लसीकरणासाठी आपल्या नावाची नोंदणी करू शकतात.
ख्रिसमसच्या निमित्ताने देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना एक मोठी भेट दिली होती. त्यांनी घोषणा केली की, 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना करोना लसीचा डोस देणे सुरू केले जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी भारत बायोटेकची करोना लस (कोव्हॅक्सिन) मंजूर केली आहे.
दरम्यान, मुलांना कोविन अॅपवर नोंदणी करावी लागेल. त्यानंतर त्यांना स्लॉट मिळेल. कोविन अॅपवरील स्लॉट दरम्यान, मुलांना त्यांचा आधार कार्ड क्रमांक विचारला जाईल. मुलांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र करण्याची शक्यता आहे.
बूस्टर डोसची तयारी
आघाडीवर असणारे आरोग्य कर्मचारी, कोविड योद्धे यांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे. त्यांनाही कोविन अॅपवर नोंदणी करावी लागेल. हा डोस घेणाऱ्या व्यक्तीला त्यांनी पूर्वी जी लस घेतली आहे, तीच लस पुन्हा एकदा देण्यात येईल. त्यासाठी कसलेही पैसे स्वीकारले जाणार नाहीत. वृद्धांनाही बूस्टर डोस देण्यात येणार आहे. त्यासाठीची नोंदणीही पूर्वीसारखीच असेल. मात्र, बूस्टर डोस घेण्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमध्ये 9 महिन्यांचे अंतर असणे गरजेचे आहे.
5 वर्षांच्या मुलासाठी लस
पाच वर्षांच्या पुढील मुलांसाठीही फायझर कंपनीने लस निर्मिती सुरू केल्याचे वृत्त आहे. या वयोगटातील मुलांचे अमेरिका आणि युरोपमध्ये लसीकरण सुरू झाले आहे. मॉडर्नाची लस 12 वर्षांपुढील मुलांसाठी आहे. याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. दुसरीकडे 12 ते 17 वयोगटातील मुलांसाठी स्पुटनिकने लस आणली असून, त्याची चाचणी सुरू आहे. विशेष म्हणजे जॉन्सन अॅण्ड जॉन्सनही 12 ते 17 वयोगटातील मुलांसाठी लस आणत आहे. त्याची चाचणीही सुरू आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!