पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या आरोपींवर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यानी फेकले झाड आणि….
पिंपरी चिंचवड : सांगवी, पिंपळे गुरव मधील काटेपुरम चौकात भर दिवसा एका सराईत गुन्हेगाराचा गोळ्या घालून खून करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपींना पकडायला गेलेल्या पिंपरी चिंचवडच्या पोलीस पथकावर आरोपींनी दोन गोळ्या झाडल्या. तर स्वक्षणार्थ पोलिसांनाही आरोपींच्या दिशेने दोन राउंड फायरिंग केले.यावेळी स्वतः पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आरोपींच्या दिशेने झाड फेकले आणि आरोपी खाली पडले. त्यानंतर आरोपींच्या मुसक्या अवळण्यात आल्या. हा प्रकार रविवारी रात्री आकाराच्या सुमारास चाकण येथील कोये, कुरकुंडी गावच्या हद्दीत घडला. या कारवाई दरम्यान पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासह पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
गणेश हनुमंत मोटे (वय २३), महेश तुकाराम माने (वय २३), अश्विन आनंदराव चव्हाण (वय २२, सर्व रा. सांगावी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडून दोन पिस्तूल जप्त करण्यात आली आहेततर योगेश रवींद्र जगताप (वय ३६, रा. गांगर्डेनगर, काटे पूरम, पिंपळे गुरव) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
आरोपींनी आपसात संगनमत करून कट रचुन परिसरात वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून योगेश जगताप याच्यावर गोळ्या झाडल्या. यात गंभीर जखमी झालेल्या योगेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
वारंवार आपला ठावठिकाणा बदलत तसेच संवादासाठी इन्स्टाग्रामचा वापर करत हे आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते. हे तिन्ही आरोपी चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोये, कुरकंडी गावात फिरत असल्याची माहिती सांगावी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोनपे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानंतर पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार चार टीम करून पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. स्वतः पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनीही घटनास्थळी धाव घेतली. कोये येथे शेताच्या कडेला एका घराशेजारील झाडीत दुचाकी दिसून आली. त्यानंतर त्या घराची रेकी केली असता घरात तीन लोक असल्याचे निश्चित झाले. मात्र, तेवढ्यातच आरोपींना पोलिसांची चाहूल लागली आणि आरोपींनी पळून जाण्यास सुरुवात केली. पोलिस आरोपींचा पाठलाग करू लागले असता दोन आरोपींनी पोलिसांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर पोलिसांनीही आरोपींवर दोन गोळ्या झाडल्या. मात्र, आरोपी हाती लागले नाही. या नंतर मात्र, खुद्द पोलिस आयुक्तांनी जंगलात पडलेले एक झाड उचलून ते पळून जाणाऱ्या आरोपींच्या अंगावर फेकले. हा प्रहार एवढा जोरात होता की तिन्ही आरोपी जागीच खाली पडले. त्यांनतर पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!