जादुटोनाची भिती दाखवून महीलेला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या भोंदुबाबास अटक, वाकड पोलिसांची कामगिरी
पिंपरी चिंचवड : जादुटोनाची भिती दाखवून महीलेला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या भोंदुबाबास वाकडं पोलिसांनी अटक केली आहे. विलास बापूराव पवार ऊर्फ महाराज (वय ४१ वर्षे, रा. मु.पो. पिंपळवंडी, ता. पाटोदा, जिल्हा बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी काळेवाडी येथे राहणाऱ्या पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित महिलेला फोन करुन पतीने त्यांना पांगळे करण्यास सांगितले असून तुमच्यात होणारे भांडण याबाबत मला माहित असल्याचे सांगितले. तसेच महिलेच्या पोटात दोन ते तीन गाठी असल्याचे सांगून आयुष्य थोडेसे राहिले आहे, असे सांगून महिलेला भीती दाखवून वारंवार फोन करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
ज्या माणसाच्या उजव्या हाताचे तळहातावर व गुप्तांगावर तीळ आहे. त्याच्याशी तुम्ही शारीरिक संबंध ठेवले तर तुम्हाला कोणीही काही करु शकणार नाही, असे आरोपीने पीडित महिलेला सांगितले.त्यानंतर त्याने स्वत:चा एक अश्लिल व्हिडिओ पाठवून त्यात उजव्या हातावरील तीळ व गुप्तांगावरचे तीळ दाखवले.
महिलेला व्हिडिओ पाठवल्यानंतर त्याने फोन करुन तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. तसेच माझ्याशी शरीरसंबंध ठेवले तर तुमचे सगळे कुटुंब सुखी राहील. तुम्हाला तुमचे कुटुंब सुखी ठेवायचे असेल तर माझ्याशी शरीरसंबंध ठेवा असे म्हणत वारंवार शरीरसुखाची मागणी करुन महिलेचा विनयभंग केला.
याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात भादवि कलम ३५४(ड), २९२, ५००, ५०९, माहीती तंत्रज्ञान अधिनीयक २००८ चे कलम ६७(ए), नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
घटनेचे गार्भीय ओळखुन पोलिसांनी आरोपीला पकडण्यसाठी डांगे चौक येथे सापळा रचून त्याला शिताफिने ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारणा केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. सदर बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक
डॉ.विवेक मुगळीकर हे अधिक तपास करीत आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!