पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिला सोडून दिले; शिवाय तिच्या परवानगीशिवाय केले दुसरे लग्न. आता.
पिंपरी चिंचवड : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिला सोडून दिले. तसेच पत्नीच्या संमतीशिवाय पतीने गावी जाऊन दुसरे लग्न केले. याप्रकरणी पती, सासरे, सासू आणि दिराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन 2012 ते डिसेंबर 2020 या कालावधीत तुळजापूर तालुक्यातील तीर्थखुर्द गावात आणि बौध्दनगर, पिंपरी येथे घडला.
पती रवी रमेश जेटीथोर (वय 27), सासरे रमेश नारायण जेटीथोर, सासू मंगल रमेश जेटीथोर, दीर राकेश रमेश जेटीथोर (सर्व रा. तीर्थखुर्द, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) अशी गुन्हा दाखल
झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती, सासू, सासरे आणि दिराने फिर्यादी विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्यासाठी पतीला अन्य लोकांनी उत्तेजन दिले. फिर्यादी यांना एक मुलगी असताना त्यांचा सांभाळ न करता पतीने गावी जाऊन फिर्यादी यांच्या संमतीशिवाय दुसरे लग्न केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!