पत्नी, सासरच्या त्रासाला कंटाळून पतीची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : पत्नी आणि सासरच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईट नोट लिहून ठेवली होती. त्यावरून हडपसर पोलिसांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी व सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सुचित्रा योगेश धनवडे (वय ४०) आनंदा धनवडे (रा. सातववाडी, हडपसर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. योगेश रूपचंद धनवडे (वय २२) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.याप्रकरणी सुरेखा रूपचंद धनवडे (वय ६५, रा. कुरळप, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मृत योगेशचे काही दिवसांपूर्वी लग्न झाले होते.  तो सध्या बेरोजगार होता. त्यावरून पत्नी सुचित्रा व सासरे आनंदा हे त्याला बोलत असत. त्यांच्यात नेहमी भांडणे होत.दररोज होणाऱ्या या त्रासाला कंटाळून योगेश यांनी १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच फिर्यादींना घरात योगेशने मृत्युपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली. त्यामध्ये पत्नी व सासरे त्रास देत असल्याने आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले. तसेच, योगेशने त्याच्या भावालाही याच स्वरूपाची चिठ्ठी पाठविली होती. त्यावरून पत्नी व सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.