शेलपिंपळगाव येथे गळफास घेऊन जोडप्याचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न, प्रेयसीचा मृत्यू ; तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड: पहिले लग्न झालेले असताना तरुणाने नर्स असलेल्या एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला खेड तालुक्यातील मोहितेवाडी येथे नेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच, प्रियकर हा बेशुद्ध झाला. ही घटना 19 डिसेंबर रोजी सकाळी दहा ते 20 डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या कालावधीत घडली. याप्रकरणी तरुणाच्या विरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

सुषमा दिनकर सोनवणे (वय 22, रा. जांभोळशी, पो. मांढवे, ता. जुन्नर) या तरूणीचा मृत्यू झाला, तर तिचा प्रियकर हरिदास कुंडलिक देवचे (वय 28, रा. जांभोळशी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दिनकर आयलु सोनवणे, (वय 45  रा मु.जांभुळशी पो ता जुन्नर जि पुणे) यानी फिर्याद दिली आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शेती करतात. तर त्यांची मुलगी शिरूर येथे एका हॉस्पिटलमध्ये मागील तीन ते चार महिन्यांपासून नर्स म्हणून काम करत होती. आरोपी हरिदास याचा विवाह झाला आहे. तरी देखील त्याने फिर्यादी यांच्या मुलीला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला खेड तालुक्यातील मोहितेवाडी येथे बोलावून तिला गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. त्यांनतर हरिदास याने देखील गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

20 डिसेंबर रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यांनतर पोलिसांनी तरुणीचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. हरिदास याला पुढील उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तरुणीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर ‘हरिदास आणि फिर्यादी यांच्या मुलीला फोनवर बोलताना फिर्यादी यांच्या लहान मुलाने पाहिले असल्याचे त्याने वडिलांना सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.