पुण्यात राष्ट्रवादी नगरसेवकाच्या मुलाचा विवाहितेवर बलात्कार; जीवे मारण्याची धमकी देत केला अत्याचार

पुणे :पुण्यातील मुंढवा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाच्या मुलाने एका विवाहित महिलेवर बलात्कार  केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुणाने पीडित महिलेच्या मुलाला आणि पतीला जीवे मारण्याची धमकी देत, तिच्यावर वारंवार बलात्कार केला आहे.

समीर बंडुतात्या गायकवाड (रा. मुंढवा गाव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुंढवा येथे राहणाऱ्या एका ३२ वर्षाच्या महिलेने मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मुंढवा परिसरातील रहिवासी असून तिचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. समीर गायकवाड याचे भाजी घेण्यासाठी फिर्यादीच्या घरी येणे जाणे होते. सुमारे दीड वर्षापूर्वी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी या घरात एकट्या असताना आरोपी घरी आला. किचनमध्ये त्याने फिर्यादी यांच्या कंबरेस पकडले. त्यांनी विरोध केल्यावर तुझ्या नवऱ्याला व मुलांना जीवे मारण्याची, तुमचे खानदान संपवून टाकीन, अशी धमकी दिली.यानंतर आरोपीनं जबरदस्ती करत पीडित महिलेवर बलात्कार केला. पीडित महिला घाबरल्यामुळे तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. यानंतर आरोपीनं अशाप्रकारे वारंवार पीडितेच लैंगिक शोषण केलं आहे.

१७ डिसेबर २०२१ रोजी दुपारी २ वाजता समीर गायकवाड हा फिर्यादी यांच्याशी पुन्हा जबरदस्तीने शरीरसंबंध करीत होता. त्यावेळी फिर्यादीचे पती व मुलाने हा प्रकार पाहिला. तेव्हा त्याने त्यांना मारण्याची धमकी देऊन निघून गेला. या प्रकारानंतर आता त्यांनी मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी समीर गायकवाड याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, नगरसेवक सुनिल ऊर्फ बंडु जयवंतराव गायकवाड यांनी आपल्याकडून जबरदस्तीने खंडणी मागितल्याचा आरोप करीत मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, आपला मुलगा समीर हा १७ डिसेबर २०२१ रोजी भाजी खरेदी करण्यासाठी गेला असता विवाहितेच्या पतीने त्यास घरात बोलावून चहा दिला व तो बाहेर गेला. तेव्हा समीर हा त्याच्या पत्नीशी बोलत असताना त्याने तिचा विनयभंग केला असे खोटे भासवून समीर याच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार देण्याची भिती दाखवून व त्यांच्या प्रतिष्ठेस बाधा आणण्याची भिती दाखवली. ही विवाहिता, तिचा पती, मुलगा व त्यांची आई, भाऊ यांनी आपल्याला जबरदस्तीने ३ लाख रुपये देण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मुंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.