कॉलेजमध्ये पाठलाग करत धरला तरुणीचा हात ; तरुणाला अटक

पिंपरी चिंचवड : मैत्री करण्याची मागणी करत तरुणाने तरुणीचा सहा महिन्यांपासून पाठलाग केला तसेच कॉलेजमध्ये तरुणीचा रस्ता अडवून तिचा हात पकडला आणि ‘कॉलेज संपल्यानंतर मला येऊन भेट, नाहीतर मी तुझा जीव घेईन’ अशी धमकी दिली. ही घटना बुधवारी (दि. 29) तळेगाव दाभाडे येथे घडली. तरुणीच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी रोमिओला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.

शिवम विनोद शेळके (वय 20, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 17 वर्षीय पीडित तरुणीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील सहा ते सात महिन्यांपासून आरोपी शिवम शेळके याने पीडित तरुणीकडे मैत्री करण्याची मागणी करत पाठलाग केला.आरोपी शिवम याचे तरुणीने फोन उचलले नाहीत, तसेच त्याच्या मेसेजला रिप्लाय दिला नाही त्यामुळे त्याने वेगवेगळ्या नंबरवरून मेसेज व फोन केले.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

तसेच त्याचा फोन उचलला नाही, तर घरात येईन, सर्वांना बघून घेईन अशी त्याने तरुणीला धमकी दिली. बुधवारी तरुणी कॉलेजमध्ये गेली असता आरोपी शिवमने तिचा पाठलाग केला. वर्गात जात असताना तिचा रस्ता अडवून शिवम याने हात पकडला आणि ‘कॉलेज संपल्यानंतर मला येऊन भेट, नाहीतर मी तुझा जीव घेईन’ अशी धमकी दिली. याप्रकरणी तरुणीने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.