लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन तरुणीवर बलात्कार ; पिंपरीतील घटना

पिंपरी चिंचवड : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला पिंपरी परिसरातील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार 24 ऑगस्ट ते 18 डिसेंबर 2021 या कालावधीत हॉटेल विक्रांत पिंपरी, मोरवाडी सार्वजनिक रोड पिंपरी, हॉटेल रिगल इन पिंपरी, हॉटेल पवित्रा पिंपरीगाव येथे घडला. याप्रकरणी एकाच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुणाल चव्हाण (सध्या रा. बृहन महाराष्ट्र कॉमर्स ऑफ कॉलेजचे वसतिगृह, शिवाजीनगर, पुणे. मूळ रा. चोचिंदेगाव, ता. महाड, जि. रायगड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 27 वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून तरुणीला पिंपरी परिसरातील विविध हॉटेलवर नेले. हॉटेलवर नेऊन तरुणीच्या इच्छेविरोधात जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर आरोपीने तरुणीसोबत लग्न करण्यास नकार दिला. तरुणीची फसवणूक केली. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.