धक्कादायक! पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील महिला पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांची गळफास घेऊन आत्महत्त्या
पुणे : पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या शिल्पा चव्हाण यांनी त्यांच्या विश्रांतवाडी येथील शांतीनगर भागातील राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्त्या केली. हा प्रकार शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आला. त्यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्त्या केली हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या घटनेने संपूर्ण पुणे शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
शिल्पा चव्हाण या गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी म्हणून कामकाज पाहत होत्या. यापूर्वी त्यांनी पोलीस दलातील विशेष शाखेत काम केले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांना गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभार देण्यात आला होता.
घटनेच्या वेळी त्यांचा स्टाफ त्यांना घरी आणण्यासाठी गेला होता. बराचवेळ फोन लावल्यानंतरही त्या फोन उचलत नव्हत्या. त्यानंतर घराचा दरवाजा ठोठावण्यात आला मात्र कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करण्यात आला. त्यावेळी शिल्पा चव्हाण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. घटनेच्या वेळी घरात दुसरी कोणतीही व्यकती नव्हती. शिल्पा यांना एका मुलगा असून तो गावी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मागील काही महिन्यापूर्वी त्यांची गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्या सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण अदयाप कळू शकलेली नाही. पोलीस दलात त्याच्या आत्महत्येबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!