चोरीचा आरोप सहन न झाल्याने घरकाम करणाऱ्या 17 वर्षीय तरुणीची आत्महत्या

पुणे : घर काम करणाऱ्या 17 वर्षीय तरुणीवर घरमालकिनीने चोरीचा आळ घेतला. हा चोरीचा आळ सहन न झाल्याने17 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मोहम्मदवाडी येथील कृष्णानगरमध्ये शनिवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी घर मालक महिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पायल बाबू चव्हाण (वय 17) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी घर मालक असलेल्या पल्लवी रितेश अग्रवाल (वय 40) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

मिळालेल्या माहितीनुसार,मृत पायल ही मागील काही महिन्यांपासून पल्लवी अग्रवाल यांच्या घरी घरकामगार म्हणून काम करत होती. परंतु पल्लवी यांनी पायल हिच्यावर पर्स आणि चप्पल चोरीचा आळ घेतला होता. तसेच तिला वारंवार त्रास देखील दिला होता. चोरीचा आळ आणि होणारा त्रास सहन न झाल्याने पायलने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.