पिंपरी चिंचवडमध्ये डोक्यात दगड घालून एकाचा खून

पिंपरी चिंचवड : डोक्यात दगड घालून गोठ्यात कामासाठी जात असलेल्या कामगाराचा खून केल्याची घटना शुक्रवारी (दि. 31) रात्री नऊ वाजताच्या सुमारास चिखली येथे घडली. सुनील शिवाजी सगर (वय 35, रा.जाधववाडी, चिखली. मूळ रा. लातूर) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुनील हे एका खासगी कंपनीत काम करीत होते. तसेच ते एका गोठ्यात सफाईचे
काम करत होते. शुक्रवारी रात्री कंपनीतून सुटल्यानंतर ते चिखली मधील एका गोठ्यामध्ये सफाईच्या कामासाठी जात होते.जाधववाडी येथून रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर जीव वाचवण्यासाठी सुनील हे एका दुकानात घुसले. मात्र, आरोपींनी सुनील यांना दुकानाबाहेर ओढले आणि त्यांच्या डोक्यात दगड घातला. त्यात सुनील
यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. चिखली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.