पोलिसानेच दिली दुसऱ्या पोलिसाची ‘गेम’ करण्यासाठी ‘सुपारी’, सराईत गुन्हेगार गजाआड, पुण्यात प्रचंड खळबळ

पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहर पोलिस दलातील एका पोलिस कर्मचार्‍याने दुसर्‍या पोलिस कर्मचार्‍याच्या खूनाची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सराईत गुन्हेगाराच्या मोबाईल तपासणीवरून ही घटना उघडकीस आली. सराईत गुन्हेगार व पोलिस कर्मचार्‍यात दहा लाख रुपयांचा व्यवहार ठरला होता.याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी कट रचून खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. एका गुन्हेगाराला अटक केली आहे. यामुळं संपुर्ण पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

योगेश प्रल्हाद अडसुळ (वय ३५, रा. काळेपडळ, एकता कॉलनी, हडपसर) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. तर पोलीस अंमलदार नितीन दुधाळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तो फरार झाला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील बाळसो लोहार यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२१पासून आजपर्यंत हडपसर व दत्तवाडी परिसरात घडला आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

नितीन दुधाळ हा फरासखाना पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.तर दिनेश दोरगे या पोलिस कर्मचार्‍याच्या खूनाची सुपारी देण्यात आली होती. सध्‍या त्यांनी नेमणूक दत्तवाडी पोलिस ठाण्यात आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक लोहार यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस कर्मचारी नितीन दुधाळ व दिनेश दोरगे या दोघामध्ये काही कारणातून वाद झाला होता. यापूर्वी ते दोघे एकमेकांच्या शेजारी राहत होते. त्याच कारणातून दुधाळ याने दोरगे याच्या खूनाची सुपारी सराईत गुन्हेगार आडसूळ याला दिली. दोरगे यांचा अपघात घडवून त्यांना कायमचे अपगंत्व आण्याचे नियोजन आरोपींनी केले होते.

दरम्यान, यामध्ये दोरगे यांचा मृत्यू झाला तरी दुधाळ हे सर्व पाहून घेणार होता.दरम्यान, हडपसर येथे नितीन दुधाळ याने आडसूळ याची भेट घेऊन ही सुपारी दिली. पण, सराईत गुन्हेगारांच्या झाडाझडती दरम्यान अडसूळ याला पोलिसांनी अटक  केले.
त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता काही संशयास्पद माहिती पोलिसांच्या होती लागली. या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकरणी अधिक तपास दत्तवाडी पोलिस करीत आहेत.

दत्तवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णा इंदलकर  यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसाद डोंगरे प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.