स्पा सेंटरमध्ये सुरु होता वेश्या व्यवसाय ; सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकत ८ महिलांची केली सुटका
पिंपरी चिंचवड : पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करत स्पा सेंटरच्या नावाच्या सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाची भांडाफोड केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 8 महिलांची सुटका करत स्पा मॅनेजरला ताब्यात घेतले आहे. ब्रिडल स्पा अँड ब्युटी, शाहु पॅलेस, किर्ती नगर, नवी सांगवी येथे शुक्रवारी (दि.31) ही कारवाई केली.
शेख लतीफ निजाम ( वय 27, रा. काळेवाडी, मुळगाव लातूर) असे अटक स्पा मॅनेजरचे नाव आहे. तसेच स्पा सेंटरचा चालक मालक पार्थ सारथी महंती (वय 35, रा.शाहु पॅलेस, किर्ती नगर, नवी सांगवी, मुळगाव- ओडिशा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक संगीता रामनाथ जाधव यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीं ब्रिडल स्पा ॲड ब्युटी या स्पा सेंटरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवुन घेत घेतात. वेश्यागमनासाठी स्पा सेंटर चालक-मालक व मॅनेजर हे प्रतिग्राहक 2 हजार 500 रुपये ते 3 हजार रुपये घेतात व त्यातुन महिलांना वेश्यागमनाचा मोबदला म्हणुन प्रत्येकी १ हजार रुपये देवुन वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती सामजिक सुरक्षा पथकाला मिळाली.
या माहितीच्या आधारे सामाजिक सुरक्षा पथकाने शुक्रवारी या स्पा सेंटरवरती छापा टाकून 3 नेपाळ या परदेशातील महिला , आसाम, पश्चिम बंगाल, दिल्ली या पर राज्यातील ४ महिला व राज्यातील 1 अशा एकुण 8 मुलींची सुटका करत मॅनेजरला ताब्यात घेतले आहे. तिथून 23 हजार 337 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!