पूर्ववैमनस्यातून मारहाण करून एकाचा खून

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड येथे खुनाच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पूर्ववैमनस्यातून एकाचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 3 ते 4 जणांविरोधात भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना थरमॅक्स चौक, निगडी ते खडी मशीन रोड, मोशी यादरम्यान 29 ते 30 डिसेंबर रोजी घडला आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

बबन बाबासाहेब केंगार असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि.31) भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयुर अनिल
सरोदे, गौरव सरोदे, अनिल सरोदे व त्यांच्या इतर मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमताने बबन केंगार यांना सायकलवर बसवून दूर घेऊन गेले. तिथे त्यांना मारहाण करून खून केला.जुन्या भांडणाच्या कारणातून हा खून केल्याचं फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी एम आय डी सी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.