जुन्नरमध्ये चारित्र्यावर संशय घेत 51वर्षीय पत्नीचा गळा आवळून खून
वडगाव कांदळी : जुन्नर तालुक्यातील कांदळी येथील १४ नंबर जवळील शिंदे मळ्यात रात्री महिलेचा पतीने चारित्र्याच्या संशयावरून गळा आवळून खून केला आहे.या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
संध्या सुरेश शिंदे (वय ५१) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे पती सुरेश दगडू शिंदे (वय ५९) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश शिंदे व संध्या शिंदे यांच्यामध्ये वारंवार भांडणे होत असे.सुरेश शिंदे हा संध्या शिंदे यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता.या कारणावरून नेहमीच दोघांमध्ये वादावादी होत होती.१ जानेवारी रोजी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास पुन्हा दोघांमध्ये जोरदार भांडणे झाली. आरोपी सुरेश यांनी मद्यप्राशन केले होते व त्यात त्याने चारित्र्याचा संशयाचा राग मनात धरून पत्नी संध्याचा हाताने गळा दाबून खून केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याची कबुली त्याने दिली. पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनवे करत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!