वीर हुतात्मा भाई कोतवाल पुण्यतिथीनिमित्त पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने अभिवादन
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने वीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या ७९ वी पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. हुतात्मा वीर भाई कोतवाल चौक फुगेवाडी येथे असलेल्या स्मारकाला भाईच्या स्मारकाला पुष्पमाला अर्पण करण्यात आल्या.
यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने रुपये दहा लक्ष रू निधी स्मारकासाठी मंजूर केलेला आहे तरी त्या मध्ये भरीव वाढ करून त्वरित स्मारकाचे काम सुरू करावे अशी मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त व पदाधिकारी गटनेते महापौर आमदार यांच्याकडे केली आहे. हुतात्मा वीर भाई कोतवाल यांच्या स्मारकासाठी तरतूद बजेटमध्ये करावी अंदाजे 25 लाख रुपये ची मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे शहराध्यक्ष गणेश वाळुंजकर यांनी केली आहे.तसेच वीर हुतात्मा भाई कोतवाल यांचे वास्तव्य बोपोडी -दापोडी या भागात होते दापोडी फुगेवाडी मेट्रो स्टेशन ला वीर हुतात्मा भाई कोतवाल यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाने केली आहे.
याप्रसंगी बोलताना मा. अध्यक्ष अशोकराव मगर – वीर हुतात्मा भाई कोतवाल यांचे जीवन चरित्र व स्वातंत्र्य संग्रामातील सहभाग पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा अशी मागणी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करणार तसेच जेष्ठ नेते पुंडलिक सेंदाने व अड सचिन आवटी यांनी हुतात्मा भाई कोतवाल यांचे समाज कार्य व स्वातंत्र्यसंग्राम मध्ये वीर हुतात्मा भाई कोतवाल यांचे योगदान बद्दल मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी संध्या गायकवाड मा. नगरसेवक रामदास सुरवशी प्रदेश अध्यक्ष बारा बलुतेदार (प्रकाश तिरलापूर्कर वीर हुतात्मा भाई कोतवाल यांचे वंशज) सौअनिताताई मगर पुणे महिला जिल्हाध्यक्ष अनिता वाळुंजकर, वंदना जाधव, शुभदा राऊत, सुजाता आपूने कुसुमताई तिरलपूर्कर, भारती तिरलापुरकर,सुनील वाळुंज, संतोष शिंदे, मा. अध्यक्ष गणेश शिंदे, कार्याध्यक्ष यशवंत आपुने, उपाध्यक्ष ज्येष्ठ कार्यकर्ते पांडुरंग दोडके, रामदास शिंदे, नितीन कुटे, भोसरी अध्यक्ष मारुती काटके, अध्यक्ष इंद्राणीनगर वसंत ढवळे, जिल्हा कार्य सदस्य मनोज शिरणामे, चिटणीस तेजस पंडित इत्यादी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी वाळुंजकर यांनी केले.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!