लग्नाचे आमिष दाखवून आधी शारीरिक संबंध नंतर टाळाटाळ, गर्भवतीने दिली बलात्काराची तक्रार

पुणे : पुण्यात 23 वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती राहिल्यावर तरुणाने लग्न न करता फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. एवढेच नाही तर तरुणाने कोणतीही जबादारी न घेता तुला काय करायचे आहे ते कर मी कोणाला घाबरत नाही, अशी धमकी दिली. याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या तरुणाविरुध्द कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम विशाल माने (वय 23, रा. कृष्णानगर, महंमदवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 23 वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल माने याने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखविले. त्यांच्याशी सप्टेंबर 2019 पासून वेळोवेळी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ही तरुणी गर्भवती राहिली. तिने विशाल याला लग्नाविषयी विचारले. पण त्याने लग्नाला नकार देत तुला काय करायचे आहे ते कर मी कोणाला घाबरत नाही, अशी धमकी दिली. तो लग्न करेल, असे समजून तिने काही महिने वाट पाहिली. आता ही तरुणी 9 महिन्याची गर्भवती झाली तरी त्याने लग्नास संमती न दिल्याने शेवटी तिने पोलिसांकडे धाव घेतली आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.