लग्नाचे आमिष दाखवून 29 वर्षीय महिला वकिलावर पोलिसानेच केला बलात्कार ; पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे : मेट्रोमोनियल साईटवर ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून पुणे ग्रामीण पोलीस दलात काम करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यानं 29 वर्षीय महिला वकिलावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी पोलीस काँस्टेबलवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
लक्ष्मण गंगाधर राऊत (वय ३३, रा. पत्रा चाळ, पाषाण मुळ रा. लोणी काळभोर) असे या पोलीस काँस्टेबलचे नाव आहे. तो सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या एटीएस सेलमध्ये कार्यरत आहे. याप्रकरणी एका २९ वर्षाच्या महिला वकिलाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि लक्ष्मण राऊत यांची मार्च २०२० मध्ये मेट्रोमोनियल या विवाहाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झाली. राऊत याने फिर्यादी यांचा मोबाईल घेऊन त्यांच्याशी ओळख वाढविली.त्यांना लग्नाचे आमिष दाखवून आरोपीनं पीडित महिलेवर वेळोवेळी लैंगिक शोषण केलं आहे.आरोपीनं पीडित महिला वकिलाला देहूरोड, पिंपळे निलख परिसरातील विविध लॉजवर घेऊन जात तिच्यावर अनेकदा बलात्कार केला आहे. गेल्या पावणे दोन वर्षांपासून लैंगिक संबंध ठेवल्यानंतर आरोपीनं पीडित महिला वकिलाशी लग्न करण्यास नकार देत, तिची फसवणूक केली आहे. या प्रकारानंतर पीडित वकिलानं चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात जात, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण राऊत विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास चतु:श्रृंगी पोलीस करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!