तरुणाची हत्या करून मृतदेह इंद्रायणी नदीत फेकला होता, एकाला अटक

पिंपरी चिंचवड : डोक्यात,छातीत आणि शरीरावर मारून तरुणाचा खून केला. त्यानंतर मृतदेह इंद्रायणी नदीच्या पात्रात टाकून दिला. ही घटना रविवारी (दि. 2) मृतदेह  इंद्रायणी नदीत फेकला. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

किशोर जाधव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह मिथिलेश भैय्या (दोघे रा. तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश सुनील सोनवणे (वय 24, रा. तळेगाव दाभाडे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुद्राबाई लक्ष्मण सूर्यवंशी (वय 65, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी इंद्रायणी नदीच्या पात्रात कातवी उड्डाणपुलाजवळ एक मृतदेह आढळला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाची ओळख पटविण्यात आली आहे.
मृत गणेश याला आरोपी किशोर आणि मिथिलेश यांनी कोणत्यातरी हत्याराने डोक्यात,छातीत आणि शरीरावर मारून त्याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गणेशचा मृतदेह इंद्रायणी नदीत फेकला. पोलिसांनी किशोर याला अटक केली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.