पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील तिघांना अटक

पिंपरी चिंचवड : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या टोळीतील तिघांना पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, दोन काडतुसे जप्त करण्यात आली. इतर दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.ही कारवाई कृष्णाई पेट्रोल पंपाजवळ वडमुखवाडी येथे सोमवारी (दि. ३) रात्री पावणे अकराच्या सुमारास करण्यात आली.

आकाश अनिल मिसाळ (वय २१, रा. इंद्रायणीनगर, भोसरी), रुपेश सुरेश पाटील (वय ३०, रा. मु. पो. वडगाव बुद्रुक, ता. चोपडा, जि. जळगाव), ऋतिक दिलीप तापकीर (वय २६, रा. पाषाण, पुणे), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर करण आणि सनी (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्यावरही दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरोडा विरोधी पथकातील पोलीस नाईक सागर ज्ञानदेव शेडगे यांनी मंगळवारी (दि. ४) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडमुखवाडी, चऱ्होली येथील कृष्ण पेट्रोल पंपाजवळ आरोपी दरोडा घालण्याच्या उद्देशाने जमले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून तीन जणांना ताब्यात घेतले. तर दोघेजण पळून गेले. आरोपींच्या ताब्यातून दोन पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, तीन मोबाईल फोन, मिरचीपूड, नायलॉन दोरी, असा ऐवज जप्त केला.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.