घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगाराकडून ३० घरफोडया उघड, लाखोंचा मुद्देमाल जप्त ; गुन्हे शाखा युनिट सहाची कामगिरी
पुणे : पुण्यातील वेगवेगळ्या भागातील बंद घरांची रेकी करुन घरफोड्या करणाऱ्या एक सराईत चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनीट सहाच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, कार असा 31 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून घरफोडीच्या 30 घटना उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. अर्जुनसिंग रजपुतसिंग दुधानी (वय 44, रा. मांजरी बुद्रूक) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने होणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेच्या युनीट सहाच्या पथकाकडूंन सुरू होता.घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार अर्जुनसिंग दुधानी याने त्याच्या साथीदारांसह संबंधित घरफोडीच्या घटना केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या युनीट सहाचे पोलिस निरीक्षक गणेश माने यांच्या पथकाने त्यास सापळा रचून अटक त्या गँगला अटक केली आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केली, तेव्हा त्याने शहराच्या वेगवेगळ्या भागात घरफोडीचे तब्बल 30 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, कार असा एकूण 31 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह- आयुक्त .रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त श्रीनिवास घाडगे, सहा.पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सपोनि.नरेंद्र पाटील, पोउनि.सुधीर टेंगले, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!