चारित्र्याच्या संशयावरून निमोण्यात विहिरीत ढकलून पत्नीचा खून

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून ऊसतोड कामगाराने आपल्या पत्नीचा विहिरीत ढकलून खून केल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील निमोणे येथे उघडकीस आली आहे. याबाबत पोलिसांनी तातडीने तपास करून चोवीस तासाच्या आतच आरोपीस गजाआड केले.

बाबासाहेब तेजराव सावंत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर सुनीता बाबासाहेब सावंत (वय ३६, रा. वंजारवाडी, ता. बदनापूर, जि. जालना) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.याबाबात बाबासाहेब रामभाऊ धस यांनी शिरूर पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. ३) निमोणे येथील बबन राजाराम काळे या स्थानिक शेतकऱ्याच्या विहिरीत महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. याबाबतची माहिती तेजराव सावंत यांनी शिरूर पोलिसांनी दिली.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन अधिक तपास केला असता सदर महिला आणि तिचा पती बाबासाहेब तेजराव सावंत हा ऊसतोड चालू असताना सकाळी १० च्या सुमारास जवळच असणाऱ्या विहिरीकडे पाणी आणण्यासाठी गेले असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. तसेच तेव्हापासुनच सदर महिलेचा पती फरार झाला होता. त्यामुळे त्याच्याबाबत संशय बळावल्याने शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार करुन तात्काळ तपास चालू केला. मंगळवार (दि ४) रोजी सदर आरोपी निमोणे-न्हावरे रस्त्यावर पळुन जात असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला अटक केली. पोलिसांनी अटक केल्यानंतर सदर आरोपीने आपणच चरित्र्याच्या संशयावरुन आपल्या पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अपर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलिस उपनिरीक्षक विक्रम जाधव, महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चरापले, पोलिस हवालदार संजू जाधव, पोलीस नाईक नाथा जगताप, धनंजय थेऊरकर, पोलीस अंमलदार आण्णासाहेब कोळेकर, संतोष सालुंके यांनी केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.