माणुसकीला काळिमा फासणारी घटना ! रिक्षा भाडं न दिल्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे :  रिक्षा भाडं देण्यासाठी पैसे नसल्याने 15 वर्षाच्या मुलीला जंगलात नेऊन बलात्कार केल्याची घटना धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना पुण्यात घडली. या संबंधी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून  रिक्षाचालकासह तिघांना अटक केली आहे.

सागर बिभीषण बचुटे (वय 24), विकी कुमार फुलो पासवान (वय 23) आणि अशोक विर बहादुर थापा (वय 23) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिची मैत्रिण पुण्यातील बुधवार पेठ इथं रिक्षातून जात होत्या. पण त्यांच्याकडे पैसे नसल्याचं रिक्षाचालक सागर बचूटेच्या लक्षात आलं. याचा फायदा उचलत नराधम रिक्षाचालकाने रिक्षा रेसकोर्ससमोरील जंगलात नेली. आणि इथे पीडित मुलीवर बलात्कार केला.

तर डिसेंबर 2021 च्या दुसऱ्या आठवड्यात फिर्यादी या फुरसुंगी परिसरात राहत असताना त्यांच्या ओळखीचे असलेल्या इतर आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मैत्रिणी सोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करून त्यांची छेड काढली. दरम्यान तक्रार आल्यानंतर हडपसर पोलिसांनी या प्रकरणी बलात्कार आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस अधिक तपास करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.