रस्त्याच्या कामात सपाटीकरण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अजस्त्र वाहनाने मागून येऊन एकाला चिरडले; जागीच मृत्यू
पुणे : कामावरून घरी चालत येत असताना रस्त्याच्या कामात सपाटीकरण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अजस्त्र वाहनाने मागून येऊन एकाला चिरडले त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला तर एक जण थोडक्यात वाचला आहे.ही घटना पुणे-पानशेत रस्त्यावरील गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत व्यंकटेश्वरा कंपनीजवळ घडली. मुत्तुराम स्वामी (वय अंदाचे 27 वर्ष रा. गोऱ्हे बुद्रुक ता. हवेली) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेजण कामावरून घरी गोऱ्हे बुद्रुक च्या दिशेने चालत येत होते. अचानक मागून वेगात आलेल्या रस्ता सपाटीकरण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अजस्त्र वाहनाने एकाला चिरडले त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा व्यक्ती थोडक्यात वाचला आहे. घटना घडल्यानंतर संबंधित चालक ते वाहन आडबाजूला लावून पसार झाला आहे. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, सहाय्यक फौजदार प्रदीप नांदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. चालकावर बेदरकारपणे वाहन चालवून पादचाऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे हे याबाबत अधिक तपास करत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!