पुण्यात दहावीत शिकणाऱ्या मुलाची आत्महत्या
पुणे : दहावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. ही घटना पुण्यातील कर्वेनगर येथील काकडे सिटी येथे शुक्रवारी (दि.7) रात्री आठच्या सुमारास घडली आहे.
आदी अमित कर्वे (वय-15 रा. काकडे सिटी, कर्वे रस्ता) असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत आदी त्याचे आई-वडील व बहिण असे चारजण काकडे सिटी परिसरात राहतात.आदीचे वडील एका खासगी बँकेत नोकरी करतात तर आई अभिनव शाळेत शिक्षिका आहे. मोठी बहिण महाविद्यालयात शिक्षण घेते तर आदी जवळच्या शाळेत 10 वी मध्ये शिकत होता. शुक्रवारी घरातील सर्वजण आपापल्या कामाला निघून गेल्यानंतर आदी घरात एकटाच होता.
सायंकाळी आदीची मोठी बहिण घरी आल्यानंतर तिला आदीने घरामध्ये गळफास घेतल्याचे दिसले. तिने तात्काळ याची माहिती आई-वडिलांना दिली. आदीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. याबाबत वारजे माळवाडी पोलिसांनी खबर देण्यात आली. आदीने आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!