पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहित तरुणीची आत्महत्या
पुणे :सासरकडील लोकांच्या छळाला कंटाळून नवविवाहित तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी पती आणि सासू यांना अटक करण्यात आली असून दिराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार १८ जुलै २०२१ ते ६ जानेवारी २०२२ दरम्यान घडला.
विक्रांत सुनिल बेगळे आणि वर्षा सुनिल बेगळे (दोघे रा. जनसेवा सांस्कृतिक हॉलजवळ, पांडवनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच दीर विस्मय सुनिल बेगळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधिका विक्रांत बेगळे (वय २३, रा. पांडवनगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.याप्रकरणी वैशाली सुनिल सोनवणे (वय ४८, रा. हडपसर) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी राधिका हिचा विक्रांत बेगळे याच्याबरोबर विवाह झाला होता.लग्न झाल्यापासून तिला माहेरहून पैसे आण. सोन्याचे दागिने आण, यासाठी सतत मानसिक व शारिरीक छळ केला जात होता. या छळाला कंटाळून तिने ६ जानेवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक टेमगिरे अधिक तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!