पिंपरीत तडीपार आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना जीवे मारण्याची धमकी

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

 

पिंपरी चिंचवड : तडीपार गुंड तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी शहराच्या हद्दीत आला. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसाच्या शर्टची आरोपीने कॉलर पकडून जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार पिंपरी भाजी मंडई येथे शनिवारी (दि.8) दुपारी घडला. याप्रकरणी तडीपार आरोपीला अटक केली आहे

सचिन शिवाजी सुर्वे (वय 37, रा. भीमनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. पोलीस हवालदार संपत मच्छिंद्र खाडे यांनी शनिवारी (दि. 8) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपी सुर्वे याला 21 सप्टेंबर 2020 रोजी दोन वर्षाकरिता पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. मात्र तो शासनाची किंवा पोलीस उपायुक्तांची कोणतीही परवानगी न घेता शहरात आला. याबाबतची माहिती मिळाल्यावर पोलीस हवालदार खाडे हे त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले. त्यावेळी तो भाजी मंडईजवळ उभा होता. त्याने पोलीस हवालदार खाडे यांची कॉलर पकडून त्यांच्याशी झटापट केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow
0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.