मेडिक्लेम गरजेचा का आहे? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे

मुंबई :अचानक आलेल्या आजारपणामुळे किंवा अपघातामुळे २४ तासापेक्षा अधिक कालावधी साठी इन्शुरन्स कंपनी कडून दावा / क्लेम घेण्यासाठी एखाद्या नोंदणीकृत रुग्णालयात भरती व्हावे लागल्यास खिशाला न परवडणारा खर्च इन्शुरन्स कंपनीकडून कॅशलेस अथवा अगोदर पैसे भरून मग कागदपत्रे इन्शुरन्स कंपनीत दाखल करून झालेला सर्व खर्च परत मिळवता येतो.

मेडिक्लेम असेल तर कोणते खर्च मिळतात

1) खोलीभाडे(Room Rent)
2) नर्सिंग चार्जेस (Nursing Charges)
3) डॉक्टर तपासणी चार्जेस (Doctor Consulting Charges)
4) डॉक्टर फेरी चार्जेस (Doctor Round Charges)
5) आय सी यु चार्जेस (ICU CHARGES)
6) गोळ्या, औषधे , सलाइन खर्च अर्थात (MEDICINES CHARGES)
7) सोनोग्राफी खर्च (SONOGRAPHY)
8) एम आर आय खर्च (MRI CHARGES)
9) सिटी स्कॅन खर्च (सिटी स्कॅन),
10) रक्त-लघवी तपासणी खर्च (Blood Urine Test),
11) प्लेटलेस (Platless) पिशवी

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

12) रक्त पिशवी खर्च
13) विशेष लॅबोरेटरी तपासण्याचे खर्च (SPECIAL LABORATORY TESTS)
14) रुग्णवाहिका खर्च (AMBULANCE)
15) ऑपरेशन थिएटरचे भाडे खर्च (OPERATION Theater Charges)
16)डॉक्टर सर्जरी खर्च( DOCTOR Surgery Charges)
असे व आणखी इतर खर्च मिळतात.

मेडिक्लेम काढणे गरजेचे का आहे ?

१)अचानक दवाखान्यात भरती व्हावे लागल्यास खर्चाची पूर्वकल्पना आणि पुरेशी आर्थिक तरतूद केलेली नसल्याने प्रचंड आर्थिक आणि मानसिक ताण येतो.

2) बँकेत बचत अथवा करंट अकाउंट मध्ये बचत करून ठेवलेले पैसे काढावे लागतात.

3) बँकेत ठेवलेली FD (एफ. डी.) मोडावी लागते.

4) सोन्याचे दागिने गहाण ठेवावे लागतात किंवा विकावे लागतात.

5) शेअर्स विकावे लागतात.

6) नातेवाईक मित्र मंडळी यांचे कडे हातपासरावे लागतात.

7) बँक अथवा खासगी सावकारा कडून कर्ज घ्यावे लागते.

8) या खर्चां करिता घर, गाडी जमीन विकताना लोक दिसतात.

9) वेळेवर खर्चायला पैसे उपलब्ध न झाल्याने आपल्या प्रिय व्यक्तींना जीव गमवावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत.

मेडिक्लेम असल्यास

1) आपण निश्चिन्तमनाने मानसिक आर्थिकदृष्ट्या कोणत्याही प्रकारच्या हॉस्पिटलचे खर्चाला सामोरे जाण्याची तयारी असते.

2) हॉस्पिटलमध्ये deposit भरण्याची शक्यतो गरज पडत नाही.

3) बँक, खाजगी सावकार यांचे कडून कर्ज घ्यायची गरज नाही.
4) घर,गाडी,जमीन,प्लॉट, फ्लॅट,दुकान, विकण्याची वेळ येत नाही.

5) चांगल्या रुग्णालयात ताठ मानेने उत्तम प्रकारची सेवा रुग्णाला घेता येते.

6) नातेवाईक मित्रमंडळी यांचे कडे हातपासरण्याची वेळ येत नाही.

7) भारतात कोठेही मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता येते.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

मेडिक्लेमची जेव्हा खऱ्या अर्थाने गरज असते तेव्हा मिळत नाही.आणि वेळेवर मेडिक्लेम घेतली तरी लाभ त्वरीत मिळेलच असे नाही.मेडिक्लेम पॉलिसी जेवढी जुनी तेवढे सर्व प्रकारचे आजार कव्हर करते.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.