लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना  शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तरुणीचा विनयभंग ; तरुणावर गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना  तरुणीकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. त्यासाठी तरुणीने नकार दिला असता तरुणाने तिला मारहाण करून जखमी केले. ही घटना 6 जानेवारी रोजी पहाटे चार ते रात्री आठ वाजताच्या कालावधीत हिंजवडी परिसरात घडली.

योगेश्वर शशिकांत पगारे (वय 25, रा. मारुंजी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 25 वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी मित्र आहेत. ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. 6 जानेवारी रोजी योगेश्वर याने तरुणीकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. तरुणीची इच्छा नसल्याने तिने यासाठी नकार दिला. त्यावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. योगेश्वर याने किचनमधील स्टिक तव्याने तरुणीच्या हातावर, पोटावर मारले. रात्री प्लास्टिकच्या पेनने तरुणीच्या हातावर मारून तिला जखमी केले. पोलिसांनी योगेश्वर याला अटक केली आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.