अल्पवयीन मैत्रिणीच्या घरात जाऊन लग्नाची मागणी घालत तिच्यासोबत गैरवर्तन

पिंपरी चिंचवड : अल्पवयीन मैत्रिणीच्या घरात जाऊन तरूणाने तिला लग्नाची मागणी घातली. तिने त्याला नकार दिला असता त्याने तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 8) रात्री चिंचवड येथे घडली. याप्रकरणी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण अरुण जानराव (रा. कस्तुरबा गांधी चौक, औंध, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 22 वर्षीय तरुणीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी यांची अल्पवयीन बहीण व घरातील इतर सदस्य एकत्र जेवण करीत होते. त्यावेळी अल्पवयीन मुलीचा मित्र आरोपी हा घरी आला. ‘तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही’, असे म्हणून त्याने सर्वांसमोर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.

त्यावेळी अल्पवयीन मुलीने ‘मला तुझ्याशी लग्न करायचे नाही. तसेच तुझ्याशी कोणतेही नातेसंबंध ठेवायचे नाही’ असे म्हणून धक्का देऊन त्याला दूर केले. त्यामुळे आरोपीने पीडित अल्पवयीन तरुणीचे डोके भिंतीवर आपटून घरातून जात असताना ‘जिथे असेल तिथून तुला उचलून नेतो’, अशी धमकी दिली. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.