आमच्या कंपनीत गुंतवणूक करा, चांगला परतावा मिळेल, म्हणत व्यवसायकाची सव्वा दहा लाखांची फसवणूक

पिंपरी चिंचवड : आमच्या कंपनीत गुंतवणूक करा. चांगला परतावा देतो’, असे आमिष दाखवून दोघांनी एका व्यावसायिकाची दहा लाख 25 हजारांची फसवणूक केली. ही घटना 10 फेब्रुवारी 2020 ते 10 जानेवारी 2022 या कालावधीमध्ये एम्पायर इस्टेट, चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी शाम साधु गायकवाड (वय 50, रा. बी यू भंडारी स्कायलाइन, दिघी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मार्स लाईफ मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक दर्शन वर्मा आणि अमित कांतीलाल जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दर्शन वर्मा याने त्याच्या मार्स लाईफ मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केलेल्या पैशावर चांगला परतावा देतो, असे फिर्यादी यांना सांगितले. त्याने कंपनीच्या अॅक्सिस बँकेच्या अकाउंटवर फिर्यादी यांच्याकडून 12 लाख रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी गायकवाड यांना एक लाख 74 हजार 119 रुपये परत दिले. यामध्ये आरोपींनी फिर्यादी यांची 10 लाख 25 हजार 851 रुपयांची फसवणूक केली.याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.