पुण्यात बुली बाईसारखा प्रकार? नग्न महिलांच्या चेहर्यावर मुलींचे चेहरे लावून बनवले अश्लिल फोटो
पुणे : देशात गाजत असलेल्या बुली बाई प्रकारासारखाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील वस्तीमध्ये राहणाऱ्या महिला व मुलींचे फोटो काढून ते अश्लील स्वरुपात तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका 25 वर्षाच्या तरुणाला अटक केली असून न्यायालयाने त्याला 15 जानवेरीपर्यंत पोलीस कोठड सुनावली आहे. याबाबत वस्तीत राहणाऱ्या व्यक्तीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार पुण्यातील खडकी परिसरात 9 जानेवारी रोजी घडला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीने परिसरात रहाणाऱ्या महिला आणि अल्पवयीन मुलींचे फोटो, व्हिडिओ स्वत:च्या मोबाईलमध्ये काढले. यानंतर ते फोटो आणि व्हिडिओ अश्लील स्वरुपात रुपांतरीत करुन ते सोशल मीडियावर व्हायरल केले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, तो 2019 पासून अशाप्रकारे फोटो आणि व्हिडिओ तयार करत असल्याचे समोर आले.
पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला आहे. तसेच इतर मोबाईलवर देखील त्याने असे व्हिडिओ तयार केले आहेत.
त्या मोबाईलचा तपास करायचा आहे, तसेच त्याने वस्तीमधील महिला आणि मुलींचे मोबाईलमध्ये अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार केले आहेत. यातील 18 वर्षाखालील 4 मुली आणि 3 महिलांची नावे निष्पन्न झाली असून उर्वरीत मुली, महिलांचा तपास करायचा आहे.
आरोपीच्या व्हॉट्सॲपच्या यादीमध्ये ब्राझील, पाकिस्तान यासह इतर देशातील ग्रुप असून त्यावर अनेक अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल केले आहेत. याबाबत त्याच्याकडे तपास करण्यासाठी, त्याचा आणखी कोण साथीदार आहे का, याचा तपास करण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केली.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!