नायलॉन मांजा विक्री करणार्‍या दोन व्यापार्‍यांना अटक; गुन्हे शाखा युनिट एकची कामगिरी

पुणे : चोरुन नायलॉन मांजा विक्री करणार्‍या व्यापार्‍याला गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्या दुकानातून नायलॉन मांजाचे १९ रिळ व रोख रक्कम असा ४९ हजार ९६० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई पुण्यातील बोहरी आळीत करण्यात आली.जुनेद अकबर कोल्हापूरवाला (वय २९, रा. गणेश पेठ) व अदनान असिफअली सय्यद (वय १९, रा. गणेश पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

प्लॅस्टिक, नायलॉन, सिंथेटिक मांजाने पक्षी व माणसांना होणार्‍या इजापासून सरंक्षण व्हावे, यासाठी या मांजाचा वापर करण्यास, जवळ बाळगण्यास बंदी घातली आहे. गुन्हे शाखेचे युनिट १ चे पथक याबाबत माहिती घेत असताना पोलीस अंमलदार मिना पिंजण व रुखसाना नदाफ यांना बोहरी आळीतील दुकानदार चोरुन नायलॉन मांजाची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दुकानात बनावट ग्राहक पाठवून खात्री करुन छापा टाकला व दुकानातील नायलॉनचा मांजा जप्त केला आहे. दोघांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

प्लॅस्टिक, नायलॉन, सिंथेटिक मांजाची विक्री करु नये, जवळ बाळगु नये व वापर करताना कोणी आढळल्यास त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.