अजित पवारांच्या मोबाईल नंबरचा वापर करून बिल्डरकडे मागितली २० लाखांची खंडणी,६ जणांना अटक

पुणे : वेगवेगळ्या प्रकारच्या फसवणुकीचे प्रकार आपण ऐकत असाल. मात्र चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून पुण्यातील बड्या बांधकाम व्यावसायिकाला  धमकावून 20 लाख रुपयांची खंडणी मागण्याचा व त्यातील 2 लाख रुपये स्वीकारण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकाने सापळा रचून 6 जणांना अटक केली आहे.

नवनाथ भाऊसाहेब चोरामले (वय 28, रा. हवेली), सौरभ नारायण काकडे (वय 20, रा. हडपसर), सुनिल ऊर्फ बाळा गौतम वाघमारे (वय 28, रा. हवेली), किरण रामभाऊ काकडे (वय 25) चैतन्य राजेंद्र वाघमारे (वय 19, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) आणि आकाश शरद निकाळजे (वय 24, रा. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अतुल जयप्रकाश गोयल (वय ४७, रा. वानवडी) यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  बंडगार्डन पोलीस ठाण्यात  IPC 384, 386, 506, 34 आयटी ॲक्ट कलम 66 (सी), (डी) नुसार गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार मागील दहा दिवसांपासून 13 जानेवारीपर्यंत सुरू होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण काकडे हा मुख्य सुत्रधार असून त्याने गुगल प्ले स्टोअरमधून फेक कॉल अ‍ॅप नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर केला. त्यावरुन त्याने दहा दिवसांपूर्वी अतुल गोयल यांना फोन केला. गोयल यांना तो अजित पवार यांच्याकडून फोन आला, असे वाटले. फोनवरुन त्याने आपण पी ए चौबे बोलतोय असे भासविले. हवेली तालुक्यातील वाढे बोल्हाई येथील शिरसवडी येथील जमिनीसंदर्भातील वाद मिटवून टाका, असे खोटे सांगून वाद मिटविला नाही तर तुम्हाला गावात पाऊल ठेवू देणार नाही, तुमचा कोणताही प्रकल्प होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांच्याकडे २० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. त्यामुळे गोयल यांना शंका आली. त्यांनी गुन्हे शाखेकडे याबाबत तक्रार केली.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचा आराखडा तयार करण्यात आला. पोलिसांच्या सांगण्यानुसार गोयल यांनी खंडणीची रक्कम घेण्यासाठी बंडगार्डन रोडवरील सन मावू कॉम्प्लेक्समधील कार्यालयात बोलावले. पोलिसांनी तेथे सापळा रचला होता. त्यानुसार गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तिघे जण 2 लाख रुपये घेण्यासाठी कार्यालयात आले होते. तिघे जण खालीच थांबले होते. पैसे घेतल्याबरोबर पोलिसांनी झडप घालून तिघांना पकडले. त्याचवेळी संपूर्ण परिसरात साध्या वेशातील पोलीस नजर ठेवून होते. कार्यालयात खंडणीखोरांना पकडल्याचे समजल्याबरोबर खाली थांबलेल्या तिघांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow
0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.