एकटी असलेल्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार ; तरुणाला अटक
पिंपरी चिंचवड : बाल अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. दररोज अल्पवयीन मुलीवर होणारे बलात्कार कमी होत नाहीत, त्यामुळे महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येऊन बसला आहे. अशीच एक धक्कादायक घटना पिंपरी मध्ये घडली आहे. घरात एकटी असलेल्या १३ वर्षीय मुलीवर २१ वर्षीय तरूणाने लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना १२ जानेवारी २०२२ रोजी रात्री साडेआठ ते साडेनऊ या कालावधीत तसेच डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत घडली.
शिवा किसन राठोड (वय २१, रा. सुसगाव, ता. मुळशी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहेत. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने शनिवारी (दि. १५) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची अल्पवयीन मुलगी घरामध्ये एकटी असताना आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध केले. गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला अटक केली.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!