पती कामाला गेल्यानंतर २८ वर्षीय पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या
पिंपरी चिंचवड : – पती कामाला गेल्यानंतर पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. 17) दुपारी बाराच्या सुमारास.पंचशील कॉलनी, वाकड येथे घडली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
शीतल रोहित पवार (वय 28, रा.पंचशील कॉलनी क्रमांक एक, वाकड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शीतल यांचा रोहित पवार यांच्याशी जुलै 2021 मध्ये विवाह झाला होता. मागील काही दिवसांपूर्वी शीतल माहेरी गेल्या होत्या. रविवारी रात्री आठ वाजता त्या माहेरहून परत आल्या होत्या. रोहित हे एका आयटी कंपनीत
नोकरी करतात.ते सोमवारी सकाळी आठ वाजता कामावर गेले. तोपर्यंत घरात सर्वकाही व्यवस्थित होते.
सकाळी दहा वाजता शीतल आणि रोहित यांचे फोनवर बोलणे झाले. दुपारी बारा वाजताच्या सुमारास रोहित यांनी परत शीतल यांना फोन केला मात्र त्यांनी फोन घेतला नाही. वारंवार फोन
करूनही शीतल उत्तर देत नसल्याने रोहित यांनी घरासमोरील महिलेला फोन करून शीतल यांच्याकडे जाण्यास सांगितले मात्र शीतल यांनी दार उघडले नाही. याबाबत शेजारी राहणाऱ्या महिलेने
सांगितले असता रोहित यांनी घरी आले. सर्वांनी मिळून दार तोडले असता शीतल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.वाकड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!