शिरगाव येथे पवना नदीच्या किनारी अवैधरित्या गावठी दारुची हातभट्टी लावुन दारु तयार करणाऱ्या महिलेविरुध्द पोलिसाची कारवाई
पिंपरी चिंचवड : शिरगाव येथे पवना नदीच्या किनारी लावलेल्या दारुभट्टीवर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. यात पोलिसांनी तीन लाख 41 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 16) दुपारी पावणेतीन वाजताच्या सुमारास करण्यात आली.
सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळाली कि, शिरगाव येथे पवना नदीच्या किनारी दारुची हातभट्टी लावली आहे. तिथे दारु तयार करुन एक महिला आजूबाजूच्या परीसरात दारु विक्री करते. त्यानुसार पोलिसांनी रविवारी दुपारी पावणे तीन वाजता सापळा लावून कारवाई केली.
तीन लाख पाच हजार 800 रुपये किमतीचे सहा हजार 116 लिटर कच्चे रसायन, 12 हजार 600 रुपयांची 210 लिटर तयार गावठी दारु आणि 22 हजार 900 रुपयांचे दारु तयार करण्याचे साहित्य असा एकूण तीन लाख 41 हजार 300 रुपयांचा.ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. दारुभट्टी लावणा-या महिलेच्या विरोधात शिरगाव पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे, पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे) काकासाहेब डोळे, सहा. पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. डॉ. अशोक डोंगरे, पोलीस अंमलदार भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, सचिन गोनटे, राजेश कोकाटे, संगिता जाधव, अतुल लोखंडे, सोनाली माने यांनी केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!