पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकास अटक; एक पिस्टल, एक काडतुसे व लोखंडी रिव्हॉल्वर जप्त

पिंपरी चिंचवड : बेकायदेशीरपणे पिस्टल आणि रोव्हॉल्वर जवळ बाळगल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक लोखंडी पिस्टल, एक जिवंत काडतूस, एक लोखंडी रोव्हॉल्वर जप्त करण्यात आले आहे.ही कारवाई सोमवारी (दि. 17) सकाळी सव्वानऊ वाजता मॅगझीन चौक, दिघी येथे करण्यात आली.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

अजित उर्फ विकी गुप्ता (वय 28, रा. गंधर्वनगरी, मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक सागर शेडगे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजित याने त्याच्याकडे पिस्टल बाळगली असल्याची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली. त्यांसुर पोलिसांनी मॅगझीन चौक, दिघी येथील एका बारच्या शेजारी सापळा लावून अजित याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक लोखंडी पिस्टल, एक जिवंत काडतूस, एक लोखंडी रोव्हॉल्वर असा एकूण 60 हजार 200 रुपयांचा अवैध शस्त्रसाठा आढळून आला. शस्त्र जप्त करत पोलिसांनी अजित याला अटक केली. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.