दगड व धारदार हत्यारांनी वार करून २९ वर्षीय तरुणाचा खून

पिंपरी चिंचवड:  दगड व धारदार हत्यारांनी वार करून २९ वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुळवेवस्ती, भोसरी येथे सोमवारी (दि. १७) रात्री अकराच्या सुमारास  उघडकीस आली.याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिन्टू कुमार सहदेव शाह (वय २९), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीतील गुळवेवस्ती येथे एक तरुण जखमी अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी पाहणी केली. तरुणाच्या डाव्या डोळ्याजवळ दगडाने मारून तसेच तोंडावर धारदार हत्याराने वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. सुरवातीला तरुणाची ओळख पटत नव्हती. मात्र पोलिसांनी परिसरात चौकशी केली. त्यानंतर संबंधित मयत व्यक्ती पिन्टू शाह असल्याचे निष्पन्न झाले. तरुणाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.