पुण्यातील बालेवाडी येथून अपहरण झालेला ‘डुग्गू’ अखेर आठ दिवसांनी सापडला
पुणे : पुण्यातील बालेवाडी (Balewadi) हायस्ट्रीट जवळील पाठशाळा परिसरातून अपहरण झालेल्या स्वर्णव चव्हाण (Swarnav Chavan) उर्फ डुग्गू या चार वर्षांच्या चिमुरड्याचे अपहरण करण्यात आले होते. पोलीस कसून त्याचा शोध घेत होते. अखेर त्या चिमुरडाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील पुनावळे येथे पोलिसांना तो सापडला.
त्यानंतर स्वर्णमचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली होती. पुणे पोलिसांची मोठी फौज मुलांला शोधत होती, खूप गुप्तता पाळून हा तपास सुरू होता, जवळपास ३०० ते साडे तीनशेच्या वर पोलीस कर्मचारी व अधिकारी या मुलांचा शोध घेत होते. अखेर आज पिंपरी-चिंचवड परिसरातील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आले आहे.
चतुरश्रृंगी पोलिसात याबाबत तक्रार आली होती, कशासाठी अपहरण केलं किंवा हा याचे कारण पोलिस शोधत आहेत. गेले आठ दिवस पोलीस सोसियल मीडियावर अनेक ठिकाणी फोटो पाठवून तपास सुरू होता. अखेर मुलाला आठ दिवसांनंतर शोधण्यात यश आले आहे. कोणी अपहरण केलं? का केलं? हे मात्र अजून कळू शकते नाही, त्याचा तपास पुणे पोलीस करत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!