गुन्हेगारी करुन दहशत निर्माण करणाऱ्या किरण रणदिवे टोळीवर मोक्का कारवाई

पुणे : कोंढवा व बिबवेवाडी परिसरात विविध गुन्हे करून दहशत पसरविणाऱ्या किरण रणदिवे व त्यांच्या टोळीतील इतर ६ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली ही ६७ वी मोक्का कारवाई आहे.

किरण नवनाथ रणदिवे (वय २५), अविनाश अर्जुन जोगण (वय २५), सूरज पांडुरंग खंडागळे (वय २८), वैभव सुभाष डबकरे (वय २५), आकाश अशोक कोळी (वय २६), गणेश जोगदंड (वय १९, सर्व रा. अप्पर इंदिरानगर), चंद्रकांत गायकवाड (वय २७, रा. कात्रज), अशी कारवाई केलेल्या सराईतांची नावे आहेत.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

रणदिवे हा टोळीप्रमुख असून त्याने साथीदारांसह अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, कोंढवा परिसरात गंभीर गुन्हे केले आहेत.आरोपी किरण नवनाथ रणदिवे याने त्याचे साथीदारांसह स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी कोंढवा, बिबवेवाडी व मार्केटयार्ड पोलीस स्टेशन व परिसरामध्ये दहशत केली असुन ते लोकांना दमदाटी करणे, घातक हत्यारांसह खुन, संघटितपणे व वैयक्तीकपणे खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, खंडणी मागणे, नागरीकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, घातक शस्त्राव्दारे दुखापत करणे, गंभीर दुखापत करणे, दंगा करणे, बेकायदेशीर घातक शस्त्रजवळ बाळगणे, दरोडयाची तयारी करणे, वाहन चोरी, पोलीसांचे आदेशाचा भंग करणे,नागरीकांना मारहाण करुन जखमी करणे यासारखे गंभीर व हिंसक गुन्हे केलेले आहेत.

 

आरोपीतांवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन सुध्दा ते धजावत नसल्यामुळे तसेच त्यांच्या वर्तनात काहीही सुधारणा होत नसल्यामुळे या टोळीवर ‘मोका’नुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार, पोलिस आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार
घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष
ठेवून,गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली सन २०२२ या चालु
वर्षातील तिसरी व एकुण ६७ वी कारवाई आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.